Sony सोबत एकत्र येणं, नव्या पर्वाची सुरुवात; मीडिया, एन्टरटेनमेंट क्षेत्रातील आघाडीची कंपनी ठरेल : पुनीत गोयंका

ZEEL-Sony Merger: झी एंटरटेनमेंट (ZEEL) आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) च्या मेगा विलीनीकरणानंतर

Updated: Sep 22, 2021, 08:58 PM IST
Sony सोबत एकत्र येणं, नव्या पर्वाची सुरुवात; मीडिया, एन्टरटेनमेंट क्षेत्रातील आघाडीची कंपनी ठरेल : पुनीत गोयंका title=

मुंबई : ZEEL-Sony Merger: झी एंटरटेनमेंट (ZEEL) आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) च्या मेगा विलीनीकरणानंतर, पुढील नियोजन आता सुरू झाले आहे. विलीनीकरणानंतर तयार झालेल्या कंपनीमध्ये ZEEL-Sony ११ हजार ६०५.९४ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. पुनीत गोयंका विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या नवीन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि सीईओ म्हणून कायम राहतील. विलीनीकरणानंतर झी एंटरटेनमेंटकडे 47.07 टक्के हिस्सा असेल. सोनी पिक्चर्सचा हिस्सा 52.93 टक्के असेल. विलीनीकरण कंपनी शेअर बाजारातही सूचीबद्ध होईल. पुनीत गोयंका यांनी विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या कंपनीच्या नियोजनावर बोर्ड सदस्यांसोबत कॉन्फरन्स कॉल केला.

पुनीत गोयंका मेगा विलीनीकरणावर काय म्हणाले?

झी एंटरटेनमेंट कॉन्फरन्स कॉलमध्ये पुनीत गोएंका यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले...

महिन्यांच्या वाटाघाटीनंतर विलीन होण्याचा निर्णय घेतला.
सौदा स्पर्धा आयोगाकडून मंजूर करावा लागेल.
सोनीसोबतच्या कराराला कोणताही धोका नाही.
विलीनीकरणानंतर टॉप मीडिया, एंटरटेनमेंट कंपनी ठरेल.
करारानंतर ओपन ऑफरची गरज भासणार नाही.
योग्य विनिमयानंतर शेअर स्वॅप गुणोत्तर निश्चित केले जाईल.
शेअरधारकासाठी चांगली कमाई कंपनीच्या माध्यमातून होईल
जाहिरात आणि सबस्क्रिप्शनमध्ये समन्वय आणेल.
विलीनीकरण पूर्ण होण्यासाठी 6-8 महिने लागू शकतात.
या कराराला 3/4 भागधारकांची मंजुरी मिळेल.
बहुतांश भागधारकांना स्पर्धात्मक नसलेल्या करारावर मान्यता मिळेल.
विलीनीकरणानंतर स्पोर्टसवरील लक्ष वाढेल.