फ्रायडे रिपोर्ट

या विकेन्डला 'देसी बॉईज' ही फिल्म्स पहायला प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. तर मराठीत 'हॅलो जयहिंद'चा ऑप्शन ट्राय करतील असचं दिसतंय. 'पारंबी' आणि 'सात बारा कसा बदलला?' या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

Updated: Nov 26, 2011, 08:54 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

या विकेन्डला अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम हे बॉलिवूडचे दोन हॅन्डसम ड्युड देसी बॉईज बनून आपल्या भेटीला आले आहेत. रोहित धवनचे हे देसी स्टार्स बॉक्स ऑफीसवर धमाल करणार असचं दिसतंय. कारण या सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला ६० ते ६५ टक्के ओपनिंग मिळालंय. जॉन आणि अक्षयची जुगलबंदी प्रेक्षकांना आवडलीय.

देसी बॉईजबरोबर 'डॅम 999' ही फिल्मही फ्रायडेला रिलीज झाली. सायन्स फिक्शनवर आधारित ही फिल्म पाहायला प्रेक्षकांना फारशी गर्दी केली नाही. या सिनेमाला पहिल्या दिवशी ३० टक्के ओपनिंग मिळालं. इंग्रजी आणि हिंदीत ही हा सिनेमा रिलीज झालाय.

शिवाय हॉलिवूडमधल्या 'ट्वायलाईट' सिरीजचा तिसरा भाग 'ट्वायलाईट- ब्रेकींग डाऊन पार्ट वन' सिनेमाही बॉक्सऑफीसवर झळकलाय. ट्वायलाईट सिरिजचा पहिल्या दोन भागांप्रमाणे ट्वायलाईट सिरीजचा तिसरा भाग मात्र  प्रेक्षकांची अपेक्षापुर्ती करण्यात अपयशी ठरलाय.

या हिंदी आणि हॉलिवूड फिल्म्सबरोबर तीन मराठी फिल्म्सही शुक्रवारी रिलीज झाल्या. २६/११ ची पार्श्वभूमी  असलेल्या 'हॅलो जयहिंद'ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळालाय. या सिनेमाला पहिल्या दिवशी ६०  टक्के ओपनिंगवर समाधान मानावं लागलंय. या सिनेमातून नितीन चंद्रकांत देसाईंनी पहिल्यांदाच अभिनयात पाऊल ठेवलंय.

'हॅलो जयहिंद' बरोबर रिलीज झालेल्या 'पारंबी' आणि 'सात बारा कसा बदलला?' या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

एकुणच काय, तर या विकेन्डला 'देसी बॉईज' ही  फिल्म्स पहायला प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. तर मराठीत 'हॅलो जयहिंद'चा ऑप्शन ट्राय करतील असचं दिसतंय