बॉलिवूडची सफर

हृतिक क्रिश 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमान खानचा बहुचर्चित एक था टायगर सिनेमा ईद दरम्यान रिलीज होणार आहे. यासह मनोरंजन विश्वातल्या बातम्या पाहूयात, बॉलिवूडची सफरमधून !

Updated: May 19, 2012, 08:19 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

हृतिक क्रिश 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमान खानचा बहुचर्चित एक था टायगर सिनेमा ईद दरम्यान रिलीज होणार आहे. यासह मनोरंजन विश्वातल्या बातम्या पाहूयात, बॉलिवूडची सफरमधून !

 

हृतिक रोशनच्या जस्ट डान्स शोचीदेखिल स्मॉल स्क्रीनवर चर्चा होती...या शोचं नवं पर्व हृतिक लवकरच स्मॉल स्क्रीनवर घेऊन येणार असल्याचं बोललं जातं होतं... मात्र हृतिक क्रिश 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे हा शो पुढे ढकलण्यात आलाय..क्रिश 2 सिनेमात हृतिकला पुन्हा प्रियांका चोप्रा साथ देतेय त्यामुळे प्रियांका सुध्दा या सिनेमाबाबत उत्सुक आहे...

 

सलमान खानचा बहुचर्चित एक था टायगर सिनेमा ईद दरम्यान रिलीज होणारेय...या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट झाल्यापासून या सिनेमाची खूपच चर्चा होतेय...त्यातच या सिनेमातून कतरिना कैफ आणि सलमान खान ही जोडी पुन्हा एकत्र दिसणारेय... या दोघांची अफलातून केमेस्ट्री एका गाण्यातूनही प्रेक्षकांना सरप्राईज करणारेय...

 

हृतिक-शाहरुख नंतर आता रणबीर कपूर सुपर हिरो बनणार असल्याची चिन्हं दिसतायत. सिकंदर कॉमिक्स या सिनेमात रणबीर सुपरहिरो बनून आपल्या फॅन लिस्टमध्ये आणखीनच भर पाडणारेय..सुपरहिरो ही बच्चेकंपनीचे फेव्हरेट मानले जातात त्यामुळे जर रणबीर सुपरहिरो बनून सिल्व्हर स्क्रीनवर आला तर बच्चकंपनीच्या रुपाने रणबीरला नवे फॅन्स मिळतील..

 

 

रोहित शेट्टीचा बोल बच्चन सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. यासिनेमात अभिषेक बच्चनसह रोहितचा हुकमी ऐक्का म्हणजे अजय देवगणनेही प्रमुख भूमिका साकारलीय....या सिनेमामध्ये अजय सिंघम सिनेमातली डॉयलॉगबाजी करताना दिसणारेय..आता माझी सटकली हा सिंघम सिनेमामधला अजयचा डायलॉग खूपच हिट झाला होता. हिच डायलॉगबाजी आता बोल बच्चन सिनेमातही पाहता येणारेय...

 

रोमान्स इज नॉट माय कप ऑफ टी हे विधान केलंय इम्रान हाश्मीने...झाडांभोवती गाणी म्हणत रोमान्स करणं मला जमणार नाही...गुडीगुडी भूमिका करण्यापेक्षा मी वेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याला अधिक पसंती देतो...खरतर बॉलिवूडमध्ये रोमॅण्टिक फिल्मस म्हणजे स्टार्सला लागली जणू लॉटरीच... मात्र इम्रानने रोमॅण्टिक फिल्मस न करण्याचा जणू चंगच बांधलाय...

 

गँग ऑफ वासेपूर या अनुराग कश्यपच्या आगामी सिनेमासाठी स्नेहा खानवलकर ही मराठमोळी तरुणी संगीत दिग्दर्शन करतेय ... या सिनेमाचं संगीत करताना स्नेहाने बरेच प्रयोग केलेत...कथानकाला साजेसं संगीत स्नेहाने या सिनेमाला दिलंय. तसंच आफ्रीकन संगीताचाही उपयोग तिने यात  केलाय..

 

मिस्टर भट्टी ऑन छुट्टी  आणि चिंटु सिनेमाला फर्स्ट डे फर्स्ट शो 25 ते 30 टक्के ओपनिंग मिळालंय... चिंटू बरोबर या आठवड्य़ात सामाजिक संदेश देणारा स्वप्न तुझे नी माझे हा सिनेमाही रिलीज झाला...मात्र याही सिनेमाला पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला..तर राम गोपाल वर्मा यांच्या डिपार्टमेंट सिनेमाला फर्स्ट डे फर्स्ट शो 30 ट्क्के ओपनिंग मिळालंय...

 

मुलांचा अतिशय लाडका शक्तिमान आता एनिमेटेड रुपात स्मॉल स्क्रीनवर भेटीला येणार आहे...हा भारतीय सुपरहिरो या निमित्ताने जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे...शक्तिमान एनिमेटेड रुपात आणण्याची इच्छा मुकेश खन्ना यांनीही व्यक्त केली होती त्यामुळे त्यांच्या आता स्वप्नपूर्ती झालीय...