सनी लिऑन घालणार आता भारतात हंगामा

पॉर्न स्टार सनी लिऑन आता भारतात हंगामा घालण्यासाठी पुढे सरसावली आहे. भारतीय वंशाची आणि कॅनडातील पॉर्न स्टार सनी लिऑन काही दिवस भारतात आहे. तिच्या आगामी सिनेमा जिस्म - २ च्या शूटींगसाठी सनी आली आहे.

Updated: Mar 22, 2012, 11:48 AM IST

www.24taas.com 

 

पॉर्न स्टार सनी लिऑन आता भारतात हंगामा घालण्यासाठी पुढे सरसावली आहे. भारतीय वंशाची आणि कॅनडातील पॉर्न स्टार सनी लिऑन काही दिवस भारतात आहे. तिच्या आगामी सिनेमा जिस्म - २ च्या शूटींगसाठी सनी आली आहे. आणि त्यात ती भरपूर मजा करतेय असेच दिसते. नुकतचं ट्विटरवर सनीने आपला एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात ती अधिकच 'हीट अॅंड हॉट' दिसते आहे.

 

सनीने ट्विट केलं आहे की, शुटींगच्या दरम्यान काढलेला माझा फोटो पाहा, शुटींगचं लोकेशन फारच सुंदर आहे. तसचं सनीने लिहला आहे की, बिग बॉसमध्ये असलेले जूही, पूजा ह्या माझ्या मित्रांसोबत मी पार्टी करीत आहे. त्यामुळे खूप मजा येत आहे.

 

 

पंजाबमध्ये जन्मलेली सनी लिऑनने काही महिन्यापूर्वीच रियालिटी शो बिग बॉस - ५ मध्ये सहभागी झाली होती, आणि यामुळेच ती अधिक चर्चेत आली. आणि म्हणूनच जिस्म - २ मध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. दिगदर्शक महेश भट्ट यांनी बिग बॉसच्या सेटवरच सनीला जिस्म - २ची ऑफर केली होती. आणि जी तिने स्वीकारली सुद्धा.