सौ चुहे खाके बिल्ली हज को चली

एकेकाळी महेश भटच्या जिस्म सिनेमात गरमा गरम सीन्स देणारी धूम आणि प्लेयर्स सिनेमात बिकीनी घालुन भरपूर अंगप्रदर्शन करणारी आणि ओमकारामध्ये बिजली सारखं नृत्य करुन घायाळ करणाऱ्या बिपाशाला झालाय तरी काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.

Updated: Dec 13, 2011, 04:01 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

एकेकाळी महेश भटच्या जिस्म सिनेमात गरमा गरम सीन्स देणारी धूम आणि प्लेयर्स सिनेमात बिकीनी घालुन भरपूर अंगप्रदर्शन करणारी आणि ओमकारामध्ये बिजली सारखं नृत्य करुन घायाळ करणाऱ्या बिपाशाला झालाय तरी काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. बिपाशा म्हणते कि तिचा किसिंग सीन्स करण्याबद्दल हरकत आहे. जिस्ममधलं जॉन अब्राहम सोबतच जादू है नशा है हे गाणं आठवून पाहा. अनेक जण अनेक वेळा हे गाणं मिटक्या मारत पाहायचे आणि त्यानंतर कित्येक दिवस झोपेत दचकून जागे व्हायचे. त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी बिपाशाच दिसू लागायची.

 

आदित्य चोप्राच्या  धूम २ मध्ये तिने घातलेली बिकिनी आठवून पाहा आणि ओमकारातलं बिडी जलाईले ले या गाण्यातला अंगाराने प्रेक्षकांना चटके बसले होते. आता तिच बिपाशा म्हणते की प्रेमाची दृष्यांना ती सहज सामोरी जाते. पण किसिंग सीन्स करताना तिला अवघडल्या सारखं वाटतं. किसिंग हा अतिशय मनात जपण्याजोगा खाजगी कप्पा आहे आणि माझ्या सुरवातीच्या दिवसात असे सिन्स नसायचे. हल्ली प्रत्येक सिनेमात किसिंग सीन्स असतात. आपल्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत बिपाशाने फक्त दोनदा किसिंग सिन्स केले आहेत. एक अर्थातच जॉनबरोबर जिस्म मध्ये आणि दुसरा रणबीर कपूरसोबत बचना ए हसिनो मध्ये केला होता. आता बिपाशाला बिकीनी घालण्याबद्दल किंवा लव्ह सीन्स करणं अवघड जात नाही पण किसिंगच्या बाबतीत मात्र तिला अवघडल्या सारखं
वाटतं.

बिपाशाने अब्बस मस्तानच्या प्लेयर्समध्ये रेड हॉट बिकीनी परिधान केली आहे. त्याबद्दल तिचं म्हणणं आहे की यासाठी चांगली शरीर संपदा असली तर बिकीनी घालुन वावरणं फार अवघड जात नाही. पण किसिंग सीन्सच्या बाबतीत
थोडसं अवघड जातं आता बोला...