एका लग्नाची दुसरी गोष्ट, चला प्रेमात पडले

एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. नाही नाही म्हणता म्हणता राधा हळुहळु घनश्याम आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये रमायला लागली आहे.

Updated: May 10, 2012, 04:17 PM IST

www.24taas.com

 

एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. नाही नाही म्हणता म्हणता राधा हळुहळु घनश्याम आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये रमायला लागली आहे.

 

राधाला घनश्यामच्या कपाटात मिळतो एका मुलीचा फोटो. आणि हा फोटो कोणाचा असेल याचा विचार राधा गेले कित्येक दिवस करते आहे. मात्र, अखेर ती देवकीला या फोटोबद्दल विचारते. देवकीचं उत्तर ऐकून राधा थोडीशी हिरमुसतेही. मात्र, नंतर सत्य समजल्यावर राधालाही धक्का बसतो.

 

इतकंच नाही तर फोटोचं सत्य समजल्यानं राधाही खूष झाली आहे. त्यामुळे आमचं सगळं वेगळ आहे असं म्हणणारी राधा आता घनश्यामच्या प्रेमात पडली आहे असंच यावरुन म्हणावं लागेल.