अलाहाबादमध्ये बॉम्बस्फोट, इंडियन मुजाहिद्दीनवर संशय

उत्तर प्रदेशात अलाहाबादमधील करेली भागात स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात ४ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. कचराकुंडीत देशी बॉम्बचा स्फोट झाल्याचे समजते.

Updated: May 23, 2012, 05:32 PM IST

www.24taas.com, अलाहाबाद

 

उत्तर प्रदेशात अलाहाबादमधील करेली भागात स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात ४ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. कचराकुंडीत स्फोट झाल्याचे समजते. पण अजूनही स्फोटाचे मुख्य कारण समजू शकलेले नाही.अलाहाबादच्या करेली भागात हा स्फोट झाल्याची माहिती आहे.

 

उत्तर प्रदेशच्या  अलाहाबादमध्ये हा स्फोट झाल्याने यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात ४ लहान मुलांचा समावेश आहे. आणि २ महिलांचा समावेशही. स्फोटाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार हा स्फोट एका कचराकुंडीत झाला आहे. पोलीस या स्फोटाची चौकशी करीत आहेत. आतापर्यंत तरी त्यांना कोणताचा पुरावा मिळालेला नाही. घटनास्थळी फॉरेंसिकची टीम रवाना झाली आहे.

 

या स्फोटासंदर्भात गृहम ंत्रालयाने युपी सरकारकडून रिपोर्ट मागविला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असण्याची शक्यता आहे. या स्फोटानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. अस ं मानलं जात आहे की, हा स्फोट देशी बॉम्बच्या साह्याने घडविण्यात आला आहे. पण अजूनही तशी पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली नाही

 

[jwplayer mediaid="106874"]