झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये आगामी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या राज्यातील निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात मायवती यांच्या बसपची सत्ता आहे, तर मणिपूर आणि गोवामध्ये काँग्रेसची सत्ता आहे. पंजाबमध्ये भाजप-शिरोमणी अकाली दलच्या युतीची सत्ता आहे. तर उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार आहे.