मराठी नगरसेवकांचा कन्नड पालिकेत राडा

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या मराठी विरोधी वक्तव्यामुळे पुन्हा एकदा बेळगावात वाद झाला. बेळगाव महापालिकेत होणाऱ्या अभिनंदनाचा ठराव फेटाळण्यात आला.

Updated: Dec 1, 2011, 10:57 AM IST

झी २४ तास वेब टीम, बेळगाव

 

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या मराठी विरोधी वक्तव्यामुळे पुन्हा एकदा बेळगावात वाद झाला. बेळगाव महापालिकेत होणाऱ्या अभिनंदनाचा ठराव फेटाळण्यात आला. गेल्या दोन महिन्यांपूर्वी या अभिनंदन ठरावामुळेच बैठकीत गोंधळ झाला होता आणि बैठक तहकूब झाली होती.

 

सरकारनं महापालिकेला बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीत कंबारांच्या अभिनंदनाला का विरोध केल्याचे विचारले आहे. मात्र बरखास्तीची पर्वा न करता मराठी नगरसेवकांनी कंबार यांच्या अभिनंदन ठरावाला विरोध केला. त्यामुळं कर्नाटक सरकार महापालिकेवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं.