राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जीच आघाडीवर

2007 मध्ये काँग्रेसनं राष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार अखेरच्या क्षणी जाहीर केला होता. मात्र यावेळी हे काम सोप्पं दिसत नाही. यावेळी काँग्रेस आणि यूपीएवर सहका-यांचाच अधिक दबाव आहे. त्यामुळे सर्वसंमतीचा विचार केल्यास प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

Updated: Jun 11, 2012, 03:41 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

2007 मध्ये काँग्रेसनं राष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार अखेरच्या क्षणी जाहीर केला होता. मात्र यावेळी हे काम सोप्पं दिसत नाही. यावेळी काँग्रेस आणि यूपीएवर सहका-यांचाच अधिक दबाव आहे. त्यामुळे सर्वसंमतीचा विचार केल्यास प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.काँग्रेसनं नेहमीप्रमाणेच राष्ट्रपतीपदासाठी आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र पाच राज्यातल्या निवडणुकांचे निकालांनंतर काँग्रेसबाबत यूपीएचे घटक पक्ष काहीसे नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसवर सर्वसंमतीने उमेदवार निवडण्याबाबत दबाव आहे.

 

अधिकाधिक घटक पक्षांच्या मते राष्ट्रपतीपदावर राजकीय पार्श्वभूमीचा उमेदवार हवा. तसंच सर्वसंमतीनंच राष्ट्रपतीपदाची निवडणूक व्हावी असाही घटक पक्षांचा आग्रह आहे. आकडेवारीचा विचार केला तर काँग्रेससाठी गणित सोपं नाही.

 

मुलायमसिंह यादव, ममता बॅनर्जी आणि मायावती या तिघांच्या पाठिंब्याशिवाय युपीएचा राष्ट्रपती होणं कठीण आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला बरीच कसरत करावी लागणार आहे. यापैकी एका जरी घटकानं माघार घेतली तरी काँग्रेसचा गेमप्लॅन बिघडू शकतो.मात्र एका दिवसातही राजकारणात उलथापालथ होऊ शकते याचा अंदाज राजकारणात मुरलेल्या प्रणव मुखर्जींना आहेच. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत ते नेहमी सावधच राहिलेत. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत गूढ कायम असलं तरी प्रणव मुखर्जी या शर्यतीत सर्वात पुढे आहेत हेही नक्की...