रेल्वे अपघात : मृतांच्या नातेवाईकांनी ५ लाख

तामिळनाडू एक्स्प्रेस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेमंत्रालयाने पाच लाख रूपये तर जखमींना एक लाख रूपये देण्याचे जाहीर केले आहे. रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या अपघाताची चौकशीही करण्यात येणार आहे.

Updated: Jul 30, 2012, 06:45 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

तामिळनाडू एक्स्प्रेस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेमंत्रालयाने पाच लाख रूपये तर जखमींना एक लाख रूपये देण्याचे जाहीर केले आहे. रेल्वेमंत्री मुकुल  रॉय यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या अपघाताची चौकशीही करण्यात येणार आहे.

दिल्लीवरुन चेन्नईला जाणाऱ्या  तामिळमाडू एक्सप्रेसला आज पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली.  या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये,तसेच गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकेळ जखमींना २५ हजार रुपये देण्याची घोषणा रॉय यांनी केली. या अपघातात  ३२ जण आगीत भाजून दगावले.  या अपघाताची कसून चौकशी केली जाईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त डी.के.सिंह यांनी दिली.

रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी दिलेल्या माहीतीनुसार नेल्लोरवरुन अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही  आग विझवली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय मित्तल आणि वरिष्ठ अधिकारीहि घटना स्थळी पोहोचल्याचे ते म्हणाले.आपघात झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना घटनास्थळी येण्यासाठी चेन्नई ते नेल्लोर ही एक विशेष रेल्वे सोडण्यात आली.