www.24taas.com, नवी दिल्ली
लाचखोरी प्रकणात दोषी आढळलेल्या भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना चार वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाख रूपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. बंगारु यांना काल सीबीआयच्या विशेष कोर्टात बंगारू यांना दोषी ठरविले होते.
आज कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आहे. बंगारुंना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली होती. २००१ साली एका इंग्रजी वेबसाईटनं बंगारु लक्ष्मण यांचं स्टींग ऑपरेशन केलं होतं. शस्त्रास्त्र पुरवठा करणा-या बोगस डिलरकडून बंगारु लक्ष्मण यांनी लाच मागितली होती. हा भाजपचा मोठा पराभव असल्याची टीका काँग्रेसनं केलीय तर शिक्षा सुनावताना बंगारु लक्ष्मण यांचं वय लक्षात घ्यावं, अशी मागणी बंगारुंच्या वकिलांनी केली होती.
संबंधित आणखी बातमी
लाचप्रकरण: बंगारुंना पाच वर्षांची शिक्षा?
लाचप्रकरणी भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु दोषी