सरकार आणि लष्करमध्ये वाद नाही- लष्करप्रमुख

सरकार आणि लष्करामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्टीकरण लष्करप्रमुख व्ही के सिंग यांनी दिलं आहे. कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचंही लष्करप्रमुख म्हणाले.

Updated: May 30, 2012, 04:55 PM IST

 www.24taas.com, नवी दिल्ली

सरकार आणि लष्करामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्टीकरण लष्करप्रमुख व्ही के सिंग यांनी दिलं आहे. कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचंही लष्करप्रमुख म्हणाले.

तसंच तेजिंदर काय करत आहेत याबाबत माहिती होती अंसही व्ही के सिंग म्हणाले.देशाच्या प्रत्येक नागरिकानं भष्टाचाराच्या विरोधात लढणं गरजेचं असल्याचंही व्ही के सिंग म्हणाले. निवृतीनंतर काय करायचे ते १ जूननंतर ठरवू असंही ते म्हणाले.

भारताचं लष्कर कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असल्याची ग्वाही लष्कर प्रमुख व्ही के सिंह यांनी दिली होती. सध्या सुरू असलेल्या सरकारसोबतच्या वादानंतर आता मात्र काही वाद नसल्याचे लष्करप्रमुखांनी म्हटंले आहे. देशानं संरक्षणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला हवं असंही सिंह म्हणाले होते.