आमदार सत्तारांविरोधात गुन्हा

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांच्या पत्नीसह इतर दोघांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: May 17, 2012, 09:47 AM IST

 www.24taas.com, सिल्लोड

 

औरंगाबद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांच्या पत्नीसह इतर दोघांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सत्तारांची पत्नी नफीसा बेगम या सिल्लोडच्या नगराध्यक्ष आहेत. त्यांच्यासह इतर दोन नातेवाईकांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगरसेवकाची निवडणूक लढण्यासाठी मोमीन जातीचे खोटे प्रमाणपत्र दाखल केल्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

निवडणुकीत लढण्यासाठी खोटे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांचे नातेवाईक शेख अखिल आणि बिलकीस बेगम यांनी नफीसा बेगम यांनी मदत केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सिल्लोडचे माजी नगरसोवक सुधाकर पंडीत यांनी या बाबत कोर्टात याचिका दाखल केली होती त्यानंतर सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल कऱण्यात आलाय या निर्णयामुळे राजकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत अब्दुल सत्तार यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले मात्र आज याबाबत ते सविस्तर उत्तर देणार आहे.

 

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="102514"]