आसनगाव – कसारा वाहतूक बंद, एक्सप्रेस गाड्या रद्द

गोंदिया विदर्भ एक्‍सप्रेसला झालेल्‍या अपघातानंतर मध्‍य रेल्‍वेची वाहतूक आसनगाव ते कसारा या स्‍थानकांदरम्‍यान पूर्णपणे ठप्‍प झाली आहे. ही वाहतूक आज सायंकाळपर्यंत बंदच राहणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य गाड्यांच्या मार्गात बदल कऱण्यात आला आहे.

Updated: Jul 20, 2012, 04:38 PM IST

 

[caption id="attachment_142991" align="alignleft" width="300" caption="मुंबई लोकल आणि विदर्भ एक्सप्रेस दरम्यान अपघात झाल्याने रेल्वे रूळावर अशा कोसळल्या."][/caption]

www.24taas.com, ठाणे

 

गोंदिया विदर्भ एक्‍सप्रेसला झालेल्‍या अपघातानंतर मध्‍य रेल्‍वेची वाहतूक आसनगाव ते कसारा या स्‍थानकांदरम्‍यान पूर्णपणे ठप्‍प झाली आहे. ही वाहतूक आज सायंकाळपर्यंत बंदच राहणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य गाड्यांच्या मार्गात बदल कऱण्यात आला आहे.

 

आसनगाव आणि कसारा मार्गावरील लांब पल्‍ल्‍याच्‍या गाड्या पुणे-दौंड-मनमाड मार्गे वळविण्‍यात आल्‍या आहेत. तर मध्‍यम पल्‍ल्‍याच्‍या काही गाड्या आज रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. या अपघात १ महिला ठार झाली असून १५  जण जखमी झालेत.

 

कल्याण-कसारा मार्गावर उंबरमाळी स्टेशनजवळ काल रात्री लोकल आणि विदर्भ एक्स्प्रेसच्या अपघातानंतर ठप्प झालेली आसनगाव ते कसारा दरम्यानची वाहतूक सुरळीत व्हायला शनिवारचा दिवस उजाडणार आहे. त्यामुळे आज मुंबईहून कसा-याला जायचं असल्यास आसनगावपर्यंतच ट्रेननं जाता येईल.
 रद्द  केलेल्‍या गाड्या

१. मुंबई-औरंगाबाद जनशताब्‍दी एक्‍स्‍प्रेस

२. मुंबई-मनमाड पंचवटी एक्‍स्प्रेस

३. मुंबई-मनमाड गोदावरी एक्‍स्‍प्रेस

४. मनमाड-मुंबई पंचवटी एक्‍स्‍प्रेस

५. मनमाड-मुंबई गोदावरी एक्‍स्‍प्रेस

६. पुणे-भुसावळ एक्‍स्‍प्रेस

७. भुसावळ पुणे एक्‍स्‍प्रेस

८. मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्‍स्‍प्रेस

९. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्‍स्‍प्रेस

१०. नांदेड-मुंबई तपोवन एक्‍स्‍प्रेस

११. मुंबई-नांदेड तपोवन एक्‍स्‍प्रेस

मुंबईत येणाऱ्या रद्द केलेल्या गाड्या

१. अमृतसर-दादर एक्‍स्‍प्रेस

२. गोरखपूर-लोकमान्‍य टिळक टर्मिनस एक्‍स्‍प्रेस

३. पवन एक्‍स्‍प्रेस

४. कुशीनगर एक्‍स्‍प्रेस