www.24taas.com, उल्हासनगर
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत पप्पू कलानी विजयी झाले आहेत. पप्पू कलानी याआधी चार वेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कुमार आयलानी यांनी कलानी यांना पराभूत केलं होतं. उल्हासनगरवर एकेकाळी पप्पू कलानींचे सर्वंकष वर्चस्व होतं त्याला तडा गेला होता. आता परत एकदा पप्पू कलानी यांनी महापालिकेत प्रवेश केला आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार शिवसेनेला १० तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर भाजपला दोन जागा आणि अपक्षांनी पाच जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेतर्फे वसुधा आणि धनंजय बोडारे पती-पत्नी विजयी झाले आहेत. तर सेनेच्या महापौर राजश्री चौधरींनीही विजय प्राप्त केला आहे. माजी महापौर लिलाबाई आशान जिंकल्या आहेत. भाजपच्या हरेश जग्यासी, जया मखिजा, राम पारवानी आणि शकुंतला जग्यासी यांनी विजय मिळवला आहे. साई बलराम फ्रंटच्या जयश्री पाटील यांनी विजय मिळवला आहे.
शिवसेनेच्या नेहा भोईर, रणजीतकौर भूल्ली, विजय सुपाळे हे उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार जाफर अली चौधरी, राजू कंडारे आणि भागीबाई लबाणा यांनीही विजय मिळवला. बसपाच्या शैला सोनताते याही जिंकल्या आहेत.