'कुणाला 'कृपा'नी लुबाडलं नाही ना?'

कृपाशंकर सिंह यांच्या कारनाम्यानी काँग्रेसची लक्तरं वेशीला टांगली असली तरी कार्यकर्त्यांना आणि काही नेत्यांना कृपा अजूनही प्रियच आहेत. त्यांनी कुणाला लुबाडलं तर नाही ना? , असं सांगत कृपांचं समर्थन केले आहे.

Updated: Mar 3, 2012, 01:20 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

कृपाशंकर सिंह यांच्या कारनाम्यानी काँग्रेसची लक्तरं वेशीला टांगली असली तरी कार्यकर्त्यांना आणि काही नेत्यांना कृपा अजूनही प्रियच आहेत. त्यांनी कुणाला लुबाडलं तर नाही ना? , असं सांगत कृपांचं समर्थन केले आहे.

 

 

मुलुंडमध्ये काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांच्या वाढदिवसाची पोस्टर्स लागली आहेत. त्यावर कृपांचाही फोटो डौलाने झळकत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते असलेलेल महादेव शेलार कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावल्याचं सांगतायेत. एवढंच नाही तर  कृपांनी काही संपत्ती कमवली असली त्यांनी कुणाला लुबाडलं तर नाही ना? असं सांगत कृपांच्या कारनाम्याचं एकप्रकारे समर्थन करत आहेत.

 

 

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गोत्यात आलेल्या कृपांचा कांगावा सुरूच आहे. मी कुठलीही चूक केली नाही, न्यायालयीन लढाई लढणार, जप्त केलेली संपत्ती माझी नाही, असे स्पष्टीकरण देताना हात झटकले. त्यामुळे कोट्यवधींनी संपती कोणाची हा प्रश्न पुढे येत आहे. त्यातच ठाण्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या संपत्तीचे समर्थन कल्याने नक्की काय चाललंय, असा प्रश्न विचारण्यात येत  आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केल्याने कृपाशंकर सिंह यांच्या कारनाम्यानी काँग्रेसची लक्तरं वेशीला टांगल्याचे दिसत आहे.  दरम्यान,  कृपाशंकर  मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची कबुली स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.मात्र कृपाशंकर सिंह अद्याप मीडियासमोर येण्यास तयार नाहीत, यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Tags: