www.24taas.com, रायगड
वाघ्या कुत्राचा पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ७३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तर या कार्यकर्त्यांवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांना मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी वापरलेल्या १० गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेल्या कार्यकर्त्य़ांना आज महाडच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुतळा हटवलेल्या कार्यकर्त्यांना रायगड पोलिसांनी घटनेच्या काही तासांनंतरच अटक केली. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्यात आला होता. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा ह़टवला होता. या प्रकऱणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे.
त्यामुळं वाद पेटण्याची शक्यता आहे. इतिहासात असं काहीही घडलेलं नाही, त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं लिहलेला इतिहास खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतली आहे. या आधीही संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक भूमिकेमुळं पुणे महापालिकेनं दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता.