www.24taas.com, नागपूर
नागपूरमध्ये जलसंधारण आणि रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरचा अहेर दिला. समाजसेवक अण्णा हजारेंच्या विरोधात अपशब्द काढल्याच्या विरोधात कार्यकर्त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधातच निदर्शनं केली.
नागपूरात काही काँग्रेस कार्यकर्ते नेहमीच राऊत यांच्या विरोधात राहिले आहेत. त्यामुळं हा वाद या निमित्तानं पुन्हा उफाळून आला आहे. राज्यात दुष्काळ असताना आपल्या खात्याच्या कामाकडे नितीन राऊत यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचा टोलाही यावेळी कार्यकर्त्यांनी लगावला. भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गाडीवर ३ दिवसांपूवी काही हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी गाडीची काचाही फोडण्यात आली.
याचा निषेध म्हणून आज अहमदनगर मध्ये भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलन न्यास या संघटनेने अण्णांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तेच केंद्रातील सत्ताधाऱ्याविरोधात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी एका खुर्चीवर कॉंग्रसचे चिन्ह असलेल घडा ठेऊन घोषणा देण्यात आल्या. आणि नंतर खुर्चीसकट घड्याचीही तोडफोड करण्यात आली.