जळगाव बनलंय 'निर्जळगाव'!

दुष्काळाच्या झळा पश्चिम महाराष्ट्राच नाहीतर इतर भागांनाही बसतायत. जळगावात पारा ४5 अंशांवर गेलाय. जलस्त्रोत कोरडे पडू लागल्यानं तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामीण भागातल्या नागरिकांना करावा लागतोय.

Updated: May 1, 2012, 09:41 AM IST

www.24taas.com, जळगाव

 

दुष्काळाच्या झळा पश्चिम महाराष्ट्राच नाहीतर इतर भागांनाही बसतायत. जळगावात पारा ४5 अंशांवर गेलाय. जलस्त्रोत कोरडे पडू लागल्यानं तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामीण भागातल्या नागरिकांना करावा लागतोय.

 

कुठे पाण्यासाठी वणवण, तर कुठे टँकरनं पाणीपुरवठा, कोरड्या पडलेल्या विहीरी, तर कुठे हातपंपाची कमी झालेली पाण्याची पातळी, पीक करपली, जमीन भेगाळली, कुठे प्राण्यांना चारा नाही. राज्याच्या ९ जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळं हे चित्र निर्माण झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि सरकारची धावाधाव सुरु आहे. मात्र इतर भागातही पाणीटंचाईचं चित्र काही वेगळं नाही. जळगावकरही काहीसा असाच अनुभव घेत आहेत. इथल्या नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना  करावा लागतोय.

 

कोट्यवधी रुपये खर्च करुन जळगावातल्या अनेक गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरु करण्यात आल्या.. मात्र ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी अजूनही वणवण करावी लागतेय. निवडणुकांमध्ये देण्यात आलेली आश्वासनंही हवेतच विरली. स्थानिक प्रशासनानंही टंचाई निवारणाची तयारी सुरु केल्याचं सांगतंय. टंचाई निवारणासाठी प्रशासनानं आराखडा तयार केलाय. मात्र तो प्रत्यक्षात येऊन त्याची अमंलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.