उर्वरित नगरपालिकांचे निकाल आज

राज्यातल्या ४६ नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी आज होते आहे. काल १९ नगरपालिकांसाठी झालेले मतदान आणि ११ तारखेला मतदान झालेल्या काही पालिका अशा ४६ नगरपालिकांची मतमोजणी आज होणार आहे.

Updated: Dec 14, 2011, 10:46 AM IST

झी २४ तास वेब टीम

 

राज्यातल्या ४६ नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी आज होते आहे. काल १९ नगरपालिकांसाठी झालेले मतदान आणि ११ तारखेला मतदान झालेल्या काही पालिका अशा ४६ नगरपालिकांची मतमोजणी आज होणार आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारत राज्यात सर्वाधिक नगरपालिकांवर सत्ता मिळवली. पाठोपाठ काँग्रेसनंही पालिका निवडणुकीत चांगले यश मिळवलं.

 

मात्र भाजप-शिवसेना-रिपाइं या महायुतीला तितकसं यश पदरात पडल नव्हतं. त्यामुळं आजच्या मतमोजणीकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आजच्या मतमोजणीतून कोण नंबर वन याचंही उत्तर मिळणार आहे. आजच्या मतमोजणीतून दिग्गजांचे राजकीय वजन समजलं जाणार आहे. इस्लामपूरमध्ये ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेबत थोरात, तुळजापूरमध्ये दुग्धविकासमंत्री मधुकर चव्हाण, उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.