कृत्रिम गर्भधारणा म्हणजे काय?

Updated: Nov 17, 2011, 06:23 PM IST

वंध्यत्वावर उपाय म्हणजे कृत्रिम गर्भधारणा. कृत्रिम गर्भधारणेत अंडी गर्भाशयातून शस्त्रक्रियेनं काढली जातात आणि शरीराच्या बाहेर त्यांचं शुक्रजंतुंशी मिलन केलं जातं.सुमारे ४० तासांनी ती अंडी फलित झाली आहेत का आणि त्यांचं पेशींमधे विभाजन होतं की नाही हे तपासलं जातं.अशी फलित अंडी (गर्भ) नंतर त्या महिलेच्या गर्भाशयात टाकली जातात, त्यामुळे अंडनलिकेला वगळलं जातं. यातून महिला गर्भधारणा करू शकतात.

 

गर्भधारणा योग्य रितीने व्हावी, गर्भ सुदृढ असावा आणि त्याची वाढ होत असताना महिलांच्या शरीरातील हार्मोनल्सची स्थिती व्यवस्थित असायला हवी.यातला एक जरी  घटक बिघडला की वंध्यत्व येतं. त्यावर उपाय म्हणून कृत्रिम गर्भधारणेचा पर्याय आहे.

 

मासिक पाळीतला बिघाड, गडबड  हे महिलांना वंध्यत्व येण्याचं महत्त्वाचं कारण आहे. काहीवेळा अंडनलिका बंद असणं किंवा जन्मजात असणाऱ्या व्यंगामुळे गर्भाशयाची रचना बदलते.त्यातील द्राव वारंवार गर्भपातास कारणीभूत ठरतात.