स्तनांच्या कँसरला जबाबदार 'लाईफस्टाईल'

मुंबई, बंगळुरू, दिल्लीसारख्या मेट्रोपॉलिटन शहरांमधल्या महिलांमध्ये स्तन कँसरच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 1982 पासून ते 2005 पर्यंत स्तन कँसरग्रस्त महिलांमध्ये जवळपास दुपप्ट वाढ झाली आहे.

Updated: Jan 7, 2012, 01:33 PM IST

नवी दिल्ली- ऑक्टोबर महिना हा जगभरात स्तन कँसर जागृती महिना या रुपात साजरा केला जातो. मुंबई, बंगळुरू, दिल्लीसारख्या मेट्रोपॉलिटन शहरांमधल्या महिलांमध्ये स्तन कँसरच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 1982 पासून ते 2005 पर्यंत स्तन कँसरग्रस्त महिलांमध्ये जवळपास दुपप्ट वाढ झाली आहे.

 

 

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या विश्लेषणातून वरील प्रमाण सादर करण्यात आलं आहे. कँसर स्पेशलिस्ट्सच्या मते शहरी महिलांमध्ये वाढत असलेल्या स्तनांच्या कँसरला त्यांची आधुनिक जीवनशैली जबाबदार आहे. शहरातल्या मुली उशीरा लग्न करतात. त्यानुसार गर्भधारणेलाही उशीर होतो. अशा गर्भधारणेच्या प्रक्रियेत स्त्रियांमधले अनेक हार्मोन्स उत्सर्जित होतात आणि याच हार्मोन्सच्या कमतरतेतून स्तनांचा कँसर होतो. असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

 

गुड़गाव हे मेट्रोपॉलिटन शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलेलं नवं शहर. येथील प्रायव्हेट हॉस्पिटलमधील ओंकोलॉजी युनिटच्या डॉक्टरांनीही सांगितलं की हल्ली शहरांत स्तन कँसरच्या रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. जंक फुड, कामाचं टेंशन, करीयरला महत्त्व दिल्यामुळे मुलांना उशीरा जन्म देणं, मुलांना स्तनपान न देणं वा कमी प्रमाणात देणं या कारणांमुळे स्तनांच्या कँसरचं प्रमाण वाढत चाललंय. (एजन्सी)