काय चाललंय क्रीडा विश्वात !

लंडन ऑलिम्पिक, इंग्लिश प्रिमियर लीग,आयपीएल आणि टेनिस स्पर्धा यामध्ये काय चालल्यात घडामोडी, यावर टाकलेला धावता आढावा.

Updated: May 16, 2012, 03:01 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

लंडन ऑलिम्पिकला अजून बराच वेळ असतानाही या महास्पर्धेसाठी तिकिटांसाठी लोकांमध्ये बराच उत्साह आहे. लोकांच्या जबरदस्त प्रतिसादामुळे या महासोहळ्यासाठी जास्तीचे तिकिट देण्याचा निर्णय ऑलिम्पिक आयोजन समितीने घेतलाय..तिकीट विक्रिच्या पहिल्या फेरीत 10 लाख पेक्षा जास्त लोकांना तिकिटं मिळाली नाहीत त्यामुळेच ऑलिम्पिक आयोजन समितीने हा निर्णय घेतलाय...

    

पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली भारताची महिला बॉक्सर मेरीकॉमची लंडन ऑलिम्पिकच्या दिशेने जोरदार आगेकुच सुरु आहे. चीनच्या किनहुआंगदाओ येथे सुरु असलेल्या क्वालिफाइंग टूर्नामेंटच्या क्वार्टर फायनलमध्ये धडाक्यात प्रवेश केलाय... मेरीकॉमने 51 किलो वजनी गटात नार्वेच्या मेरियल हेनसेनचा 18-6 असा एकतर्फी पराभव केला.

 

आयपीएल

दिल्ली डेअरडेव्हिल आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने बाजी मारली. पंजाबने दिल्लीसमोर विजयासाठी 137रन्सचे आव्हान ठेवले होते. मात्र हे लक्ष दिल्लीने सहज 5 विकेट गमवून पार केलं. या विजयात जयवर्धेनेने 56 रन्स केल्या.

 

दिल्ली डेअरडेव्हिल आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने बाजी मारली. या विजयानंतर दिल्लीचा प्ले ऑपमधील प्रवेश निश्चित झालाय. या विजयासह दिल्लीने अंतिम चार संघामध्ये प्रवेश केलाय. या प्रवेशानंतर दिल्लीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

 

 टेनिस स्पर्धा

महेश भूपती आणि रोहन बोपन्ना यांचे माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेतील  आव्हान संपुष्टात आलय.. तर दुसरीकडे लिएंडर पेस आणि त्याचा पार्टनर रॅडेक स्टेपनेक यांनाही माद्रिदमधून रिकाम्या हाथीच परतावे लागलय...क्वार्टर फायनलमध्ये भूपती-बोपन्ना यांना रॉबर्ट लिंडस्टेड आणि होरीया टेकेंयी यांनी 6-4, 1-6, 10-7 असे पराभूत केले ..


भारताच्या सानिया मिर्झा आणि सोमदेव देवबर्मन यांच्या जागतिक टेनिसमधील सिंगल्सच्या क्रमवारीत चार आणि पाच स्थानांची सुधारणा झाली असून सानिया 191व्या स्थानावरुन 187 स्थानावर पोहोचलीय. तर सोमदेवने 235 व्या क्रमांकावरुन 230व्या स्थानावर उडी घेतलीय.. सानियाची डबल्समध्ये मात्र घसरण झालीय तीला तीन स्थानाचे नुकसान झाले असून ती 12व्या स्थानी घसरलीय..


इंग्लिश प्रिमियर लीग

मॅचेंस्टर सिटीने इंग्लिश प्रिमियर लीग विजेतेपदास गवसणी घातलीय..हा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मँचेस्टर सिटीच मँचेस्टर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आल. सिटीने तब्बल 44 वर्षांनंतर विजेतेपद मिळवलय.  मॅचेस्टर सिटीने मिळवलेल्या या जबरदस्त विजयामुळे त्यांच्या चाहत्यांचा उत्साह आणि आनंदाला सीमाच उरली न्हवती.