कायदे कसे तोडावे, पॉमर्सबॅचकडून शिकावे

भारतीय वंशाच्या एका अमेरिकी महिलेसोबत छेडछाडीच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ल्यूक पॉमर्सबॅचचा कायदे तोडण्याबाबत जुना रेकॉर्डच आहे.

Updated: May 18, 2012, 04:50 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भारतीय वंशाच्या एका अमेरिकी महिलेसोबत छेडछाडीच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ल्यूक पॉमर्सबॅचचा कायदे तोडण्याबाबत जुना रेकॉर्डच आहे. ऑस्ट्रेलियातही यापूर्वी अशाच हरकती त्याने केलेल्या आहेत. पश्चिम ऑस्ट्रेलियाचा २८ वर्षीय क्रिकेटर पॉर्मर्सबॅच पहिले किंग्स इलेव्हन पंजाबसाठीही आयपीएलमध्ये खेळला आहे.

 

त्याने २००८-०९ या हंगामात पाच इनिंगमध्ये १५० रन केले होते. काल दिल्ली डेअरडेव्हिल्स सोबत झालेल्या मॅचनंतर दिल्लीतील मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये पार्टी दरम्यान एका अमेरिकी महिलेसोबत छेडछेड करणं आणि तिच्या बॉयफ्रेंडला मारहाण करणं या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. मागील वर्षी फिटनेसच्या कारणामुळे तो क्रिकेटपासून दूरच होता. नोव्हेंबर २००७ मध्ये पॉमर्सबॅच आणि शॉर्न मार्श यांना ऑस्ट्रेलिया आणि किंग्स इलेव्हन पंजाब टीम मधून निलंबित करण्यात आलं होतं.

 

दोघांवर क्वींसलॅंडच्या मॅचनंतर दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ऑगस्ट २००९ मध्ये 'हिट अँड रन'च्या दोन प्रकरणात पॉमर्मबॅचला अटक होता होता बचावला होता. तेव्हा त्याने मान्य केलं होतं की, नशेत धुंद होऊन गाडी चालवत होता. आणि त्याला अटक करण्यात आलेल्या पोलिसांना देखील त्याने मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्यावर १०००० डॉलर शिक्षा ठोठवण्यात आली होती.

 

वाका ने म्हटंल आहे की, मेडिकल आणि काऊंन्सिलिंग नंतरच त्याची टीममध्ये परतु शकतो. याआधी याच वर्षी, स्टीवस रिझर्वमध्ये अभ्यास मॅचच्या दरम्यान उपस्थित न राहिल्याने त्याचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे पॉमर्सबॅच हा नेहमीच याना त्या कारणाने चर्चेत राहिला आहे. त्याने नेहमीच शिस्तभंग केला आहे. त्यामुळे आता त्यात आणखी भर पडली आहे.