फिक्सिंगमुळे प्रथमच 'जेल' फिक्स?

सलमान बट्ट आणि मोहम्मद आसिफ हे पाकिस्तानचे क्रिकेटपटू स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. लंडनच्या कोर्टानं हा निर्णय दिला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच फिक्सिंग प्रकरणी निर्णय देण्यात आला आहे.

Updated: Nov 1, 2011, 04:53 PM IST

क्रिकेटच्या इतिहासात क्रांतीकारी निर्णय

झी २४ तास वेब टीम, लंडन

सलमान बट्ट आणि मोहम्मद आसिफ हे पाकिस्तानचे क्रिकेटपटू स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. लंडनच्या कोर्टानं हा निर्णय दिला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच फिक्सिंग प्रकरणी निर्णय देण्यात आला आहे.

बट्ट दोषी आढळल्यानं त्याला सात वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये जाणून-बूजून नो-बॉल टाकण्याचा प्लान तयार करुन स्पॉट फिक्सिंग घडवून आणल्याचा आरोप या दोघांवर होता. त्याचप्रमाणे सलमान बट्टनं लाच घेतल्याचा आरोपही होता.

लंडनच्या 'द न्यूज ऑफ द वर्ल्ड' या वृत्तपत्रानं स्टिंग ऑपरेशन करत स्पॉट फिक्सिंगचा हा मोठा खुलासा केला होता. त्यानंतर आयसीसीनं सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिरला निलंबित केलं होतं. त्यानंतर लंडनच्या कोर्टामध्ये याची सुनावणी सुरु झाली. आणि अखेर या प्रकरणावर तब्बल एका वर्षानं निर्णय देण्यात आला आहे.