भारताचा 'पर्थ' मधला विजय 'Worth'

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी सीरीजमधील पर्थ येथील भारत वि. श्रीलंका या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये भारताने ४ विकेट राखून विजय साकार केला आहे. विराट कोहली ७७ आणि सचिन तेंडुलकर यांनी ४८ रन केले.

Updated: Feb 8, 2012, 06:01 PM IST

www.24taas.com, पर्थ

 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी सीरीजमधील पर्थ येथील भारत वि. श्रीलंका या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये भारताने ४ विकेट राखून विजय साकार केला आहे. विराट कोहली ७७ आणि सचिन तेंडुलकर यांनी ४८ रन केले. मात्र विराट कोहली आऊट झाल्यानंतर भारत अडचणीत आला होता. मात्र मी रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन यांनी जास्त पडझड होऊ दिली नाही ४ गडी आणि २० बॉल राखून विजय मिळवला. अश्विनने ३० रन तर जडेजाने २४ रन करून विजयात मोलाचा वाटा उचलला. तिरंगी मालिकेतील भारताचा हा पहिलाच विजय आहे.

 

मॅचचे  LIVE  अपडेट पाहाण्यासाठी क्लिक करा.

 

भारत वि. श्रीलंका मॅच चांगलीच रंगतदार होणार असे दिसून येते. चांगल्या फॉर्मात असणारा विराट कोहली 77 रन वर रनआऊट झाला. रोहित शर्मानंतर सुरैश रैना हा देखील फ्लॉप ठरला फक्त 24 रन करून तो पॅव्हेलियन मध्ये परतला. तर त्यापाठोपाठ इंडियन कॅप्टन महेंद्रसिंह धोनी हा फक्त 4 रन करून आऊट झाला. त्यानंतरही रविंद्र जडेजा याला सोबतीला घेऊन विराटन किल्ला लढवत ठेवला होता.

 

परंतु एक चोरटी धाव घेण्याच्या नादात तो रनआऊट झाला. त्याला मलिंगाने बाद केले. मलिंगाने थेट स्टंपवर बॉलचा थ्रो करत विराटची खेळी संपवली. पण त्याच सोबत विराट जखमी सुद्धा झाला. विराटने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण मलिंगाने थ्रो करणार हे पाहून विराट सरळ जमिनीवर लोळण घेतली त्यातच त्याला गंभीर दुखापत झाली आहे. आता रविंद्र जडेजा  आणि आर. अश्विन हे खेळत आहे. त्यामुळे भारताच्या अजूनही मॅच जिंकण्याचा आशा टिकून आहेत. जडेजा 4 रन तर अश्विन 8 रनवर खेऴत आहे. भारताला जिंकण्यासाठी 11 ओव्हरमध्ये आणखी 42 रन हवे आहेत. तर 4 विकेट अजूनही बाकी आहेत.

 

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील दुसऱ्या वनडे मॅचमध्ये इंडिया हळूहळू विजयाकडे कूचकरीत आहे. सचिन 48 रनवर आऊट झाल्यानंतर त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने फक्त 10 रनची भर घालून परतीची वाट धरली. त्याला परेराने दिलशान करवी कॅचआऊट केले. पण अजुनही विराट कोहली मात्र चांगली खेळी करत आहे त्याने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले आहे. त्यामुळे भारत विजय मिळवण्याची आशा बळकट झाली आहे. विराट कोहलीने संयमी खेळी करत 75 बॉलमध्ये 59 रन केले त्यात त्याने 7 फोर मारले. त्याच्या खेळीने भारत खिंड त्याने एकाबाजूने लढवत ठेवली आहे.

 

अजूनही भारताला जिंकण्यासाठी 19 ओव्हरमध्ये 85 रनची गरज आहे. विराट कोहली 59 रनवर खेळत आहे तर सुरेश रैना 23 रनवर बॅटींग करीत आहे. जर भारताने हा सामना जिंकल्यास तिरंगी लढतीत चांगलीच चुरस निर्माण होईल.

 

ऑस्ट्रेलियातील तिरंगी सीरीजमधील भारत वि. श्रीलंका या दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा सचिनने निराशाच केली आहे. सेहवाग सोबत आलेल्या सचिनने खरं तर आज आश्वासक आणि चांगली सुरवात केली होती. काही चांगले आणि खणखणीत फटके देखील त्याने मारले. तो फॉर्ममध्ये आला आहे असं वाटत असताना श्रीलंकेच्या मध्यमगती बॉलर अॅंजोलो मॅथ्यूसने सचिनला बोल्ड केलं.

 

सचिनने 63 बॉलमध्ये 48 रन केले त्याने 5 फोर मारले. त्यामुळे पुन्हा एकदा सचिनचच्या महाशतकाची वाट पाहावी लागणार आहे. सचिन या सीरीजमध्ये त्याचं महाशतक पुर्ण करतो की नाही हेच पाहायचं आहे. सचिन आऊट झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा बॅटींग करत आहे. भारताला जिंकण्यासाठी आणखी 137 रनची 27 ओव्हरमध्ये गरज आहे.

 

श्रीलंकेच्या २३३ धावांचा पाठलाग करताना भारताला पहिला झटका बसला. सेहवाग मलिंगाच्या चेंडूवर थर्डमॅनच्या वरून षटाकार मारण्याचा नादात झेल बाद झाला. त्याने ८ चेंडूत १० धावा केल्या.

 

या पूर्वी लंकेने भारतासमोर २३४ रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. लंकेने ८ विकेटच्या बदल्यात २३३ रन्स केल्या. लंकेकडून सर्वाधिक रन्स चंदीमलने केल्या. त्यांने ८१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. अँजलो मॅथ्यूज  आणि मलिंगा नाबाद राहिला. मॅथ्यूजने ३३ तर मलिंगाने १ रन्स केली. तर भारताकडून सर्वाधिक विकेट आर. अश्विनने घेतल्या. त्यांने तिन