२२ साल बाद

क्रिकेटमध्ये देवपदाला पोहचलेल्या विक्रमवीर सचिन तेंडूलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्षे पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत २२ वर्षे पूर्ण करणं हा त्याच्या नव्हे तर विश्व क्रिकेटच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरेल.

Updated: Nov 15, 2011, 06:15 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

क्रिकेटमध्ये देवपदाला पोहचलेल्या विक्रमवीर सचिन तेंडूलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्षे पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत २२ वर्षे पूर्ण करणं हा त्याच्या नव्हे तर विश्व क्रिकेटच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरेल. सचिनने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर १९८९ साली इम्रान खान, वसिम अक्रम आणि पदार्पण करणाऱ्या वकार यूनुसच्या भेदक गोलंदाजी निर्धाराने सामना केला होता.

 

सचिनने पदार्पणात जरी फक्त १५ धावा केल्या असल्या तरी ज्या प्रग्लभतेने त्याने अक्रम आणि यूनुसच्या तूफानी गोलंदाजीचा सामना केला तेंव्हाच सारया क्रिकेट विश्वाने त्याची दखल घेतली. याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाकाला जखम झालेली असताना देखील सचिनने न डगमगता खेळपट्टीवर उभं राहून बॅटिंग केली होती. इम्रान खान आणि जावेद मियांदाद यांना देखील कळून आलं की क्रिकेटच्या क्षितिजावर एका नव्या तारयाचा उदय झाला आहे.

 

तेंडूलकरने क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक १८२ कसोटी सामन्यात खेळण्याचा विक्रमाची नोंद केली आहे. त्याचबरोबर त्याने ४५३ एक दिवसीय सामन्यातही आपल्या बॅटचे पाणी अनेक गोलंदाजांना पाजलं आहे. एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर जमा आहे. कसोटी सामन्यात १५,०४८ रन्स तर एक दिवसीय सामन्यात १८,१११ रन्स त्याने फटकावल्या आहेत. विक्रमादित्य तेंडूलकरला झी २४ तास वेब टीमचा प्रणिपात.