९९ सेंच्युरीही तेवढ्याच महत्त्वाच्या- सचिन

'शंभराव्या सेंच्युरीचा आनंद झाला असून, याआधीच्या ९९ सेंच्युरीही महत्त्वाच्या असल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मत व्यक्त केलं आहे'. 'तसंच विराट प्रॉमिसिंग प्लेअर असून तो अजून शिकतो आहे', 'त्याच्यावर प्रेशऱ टाकू नका'.

Updated: Mar 21, 2012, 03:19 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

'शंभराव्या सेंच्युरीचा आनंद झाला असून, याआधीच्या ९९ सेंच्युरीही महत्त्वाच्या असल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मत व्यक्त केलं आहे'. 'तसंच विराट प्रॉमिसिंग प्लेअर असून तो अजून शिकतो आहे', 'त्याच्यावर प्रेशऱ टाकू नका'. असा सल्लाही सचिनने दिला आहे. सचिनच्या स्वागतासाठी यावेळी त्याची पत्नी अंजलीही उपस्थित होती.

 

बांग्लादेशमध्ये झालेल्या एशिया कपमधून मायदेशी परतलेल्या टीम इंडियाच्या स्वागताकरता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर फॅन्सची गर्दी होती. बांग्लादेशविरूद्ध महासेंच्युरी झळकावल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही मुंबईत परतला. त्यावेळी तो बोलत होता.

 

काल बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या मॅचमध्ये बांग्लादेशने श्रीलंकेला धूळ चारली, आणि सोबतच टीम इंडियाला घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे भारत एशिया कपच्या फायनलमध्ये पोहचू शकला नाही. आणि त्यामुळे टीम इंडिया आज भारतात परतली आहे.