सायनाची रँकिंग घसरली, चिंता वाढली

यंदाचा मोसम सायना नेहवालसाठी कठीण दिसत आहे. लंडन ऑलिम्पिकमुळे पुढील वर्ष सर्वच खेळाडूंच्या दृष्टिने महत्त्वाचे असताना सायनाच्या रॅंकिंगमध्ये घसरण झाल्याने बॅटमिंटन क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

Updated: Dec 6, 2011, 05:59 AM IST

झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली

 

 

यंदाचा मोसम सायना नेहवालसाठी कठीण दिसत आहे. लंडन ऑलिम्पिकमुळे पुढील वर्ष सर्वच खेळाडूंच्या दृष्टिने महत्त्वाचे असताना सायनाच्या रॅंकिंगमध्ये घसरण झाल्याने बॅटमिंटन क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

 

 

सायनाची कामगिरी अन् रँकिंग खालावले असल्याने  मार्गदर्शक पुलेला गोपीचंदसह तिचा वादही झाला होता. गुरु - शिष्येची ही जोडी फुटलीही होती पण ; सायनाने पुन्हा एकदा गुरू गोपीचंदच्या साथीने सरावाला सुरुवात केलीय . चुकांमधून धडे घेत तिने पुन्हा एकदा ' मिशन लंडन ' ला सुरुवात केली आहे .  काही गोष्टींवर सायना व माझ्यात दुमत होते . पण ; आता झाले , गेले मागे टाकून आम्ही पुन्हा लंडन ऑलिम्पिकच्या दृष्टिने तयारीला सुरुवात केली आहे . सायना चुकांमधून शिकून कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतेय . तिच्या भवितव्यासाठी हे चांगलेच आहे , असे गोपी म्हणाला.

 

 

बॅडमिंटनची गुणवत्ता लाभलेली सायनासारखी खेळाडू मिळणे कठीणच . योग्य ते मार्गदर्शन करून तिच्याकडून लंडन ऑलिम्पिकमुळे सरस कामगिरी करून घेण्याचे काम आमचे आहे', असे गोपी सांगतो .  दरम्यान, सायनाचा फॉर्म हरपल्याने गोपीच काहीसा चिंतेत आहे.  सायनाच्या फॉर्मविषयी मी काहीसा चिंतेत आहे . ऑलिम्पिक सात , आठ महिन्यांवर आले असताना असे विचार मनात येणारच . पण ; सायनावर माझा विश्वास आहे . हवे तर तिची आतापर्यंतची कामगिरी बघा . तिच्या करिअरचा आलेख चढताच राहिलाय . प्रथमच तिला अशा फ्लॉप शोला सामोरे जावे लागतेय . मात्र , सायना पुन्हा झोकात पुनरागमन करेल , याची खात्रीही  मार्गदर्शक गोपीला वाटतेय.