www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
रुपयाच्या घसरणीमुळे परदेशात शिक्षण घेणा-या मुलांच्या पालकाचं आर्थिक गणित बिघडलय. तर ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवसायावरही 20 टक्के परिणाम झालाय.
चार चाकी गाड्यांचे गॅरेज चालवणा-या कुलकर्णी यांचा मुलगा सौरभ सध्या न्यूयॉर्कमध्ये उच्च शिक्षण घेतोय. या कोर्सची वार्षिक फी 21 हजार 300 डॉलर आहे. तर इतर खर्चासाठी 300 डॉलरचा खर्च येणार आहे. एका डॉलरचा 55 रुपये असा दर असताना कुलकर्णी यांनी या सा-या पैशांची जुळवाजुळव केली होती. मात्र आता त्यांना शैक्षणिक फीस भरण्यासाठी तब्बल अडीच लाख रुपये जास्त भरावे लागणार आहे. तर अन्य खर्चासाठी 65 हजार अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. म्हणजेच रुपयाच्या घसरणीमुळे त्यांना प्रतीवर्ष तीन लाखांचा फटका बसणार आहे.
रुपयाच्या घसरणीमुळे पर्यटकांची परदेशीवारी थंडावल्यानं ट्रॅव्हल्स कंपनीचे मालकही चिंतेत आहेत. रुपयाच्या घसरणीचं हे प्रातिनिधीक उदाहरण. ढासळत्या अर्थव्यवस्थेचा फटका बसलेले असे अनेक जण आज देशभरात आहेत. त्यामुळे रुपयांची घसरण थांबवण्यासाठी सरकार कधी ठोस उपाययोजना करणार याकडंच आज सर्वांच लक्ष लागलंय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.