www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
त्यामुळं गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी वेटिंगवर असलेल्या शेतक-यांना पाणी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पाण्याच्या या टक्केवारीनुसार शेतक-यांना एक रोटेशन पाणी देता येऊ शकेल आणि जायकवाडी धरण टंचाईग्रस्त या व्याख्येतूनही ते मोकळे होतील.
सध्या वरच्या भागातील सर्वच धरणं १०० टक्के भरली आहे, त्यामुळं वरून नैसर्गिक नियमानं काही पाणी येत आहे, हा प्रवाह असाच सुरु राहिल्यास पाणी ३५ टक्क्यांपर्यंतही पोहोचू शकण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.