मनसे कार्यकर्त्यांनी `टोलबंद`चा नारळ फोडला

उस्मानाबादेत कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा १२ तारखेआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. येणेगूर टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे.

Updated: Feb 10, 2014, 06:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उस्मानाबादेत कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा १२ तारखेआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. येणेगूर टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे.
पोलिसांना या कार्यकर्त्यांना नोटीसही दिल्या होत्या, मात्र नोटीसला न जुमानता कार्यकर्त्यांनी टोलनाक्याकडे दिशेने जाण्यास सुरूवात केली आहे.
कार्यकर्त्यांनी हा टोल नाका अखेर बंद पाडला आहे. टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यकर्त्यांनी टोल न घेण्यासाठी धमकावलं असल्याने, या टोल नाक्यावरून वाहन चालक गाडी सुसाट नेत आहेत.
राज ठाकरे यांनी पुण्याच्या भाषणात या टोलनाक्याचा उच्चार केला होता, तसेच माहितीची अधिकारातून बाहेर आलेली माहितीच्या आधारे भाष्य केलं होतं.
राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत दिलेली माहिती, ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने माहितीच्या अधिकाराखाली दिली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर टोलनाक्याचं गौडबंगाल
हा टोलनाका कोणत्याही पुलाकरीता अथवा रस्त्यासाठी नाही
तरीही येणेगूर हा टोल नाका ३ कोटीचा खर्च वसूल करण्यासाठी आहे
येणेगूर टोलनाक्यावर २४ तासांत ३० हजार वाहनांची ये-जा
दिवसभरात सरासरी ५ लाख रूपयांची टोल वसुली
या प्रमाणे दोन महिन्यात ३ कोटी वसूल
तरीही अजुनही टोल वसुली सुरूच
टोल वसुलीचा कार्यकाळ १७ डिसेंबर २००२ ते २० नोव्हेंबर २०११
टोल वसुलीला मुदतवाढ २१ नोव्हेंबर २०११ ते १९ नोव्हेंबर २०१२

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.