शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी ४ गोष्टी

हिंदु धर्मग्रंथामध्ये शनीदेवाला महत्त्वाचं स्थान आहे. शनीदेव न्यायाधीशाची भूमिका बजावतात. मनुष्याच्या चांगल्या-वाईट कामांचं फळ शनीदेव देतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीदेव प्रतिकूल स्थानावर असतात त्यावेळेस मनुष्याला प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागतो.

Updated: Mar 12, 2016, 10:27 AM IST
शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी ४ गोष्टी title=

मुंबई : हिंदु धर्मग्रंथामध्ये शनीदेवाला महत्त्वाचं स्थान आहे. शनीदेव न्यायाधीशाची भूमिका बजावतात. मनुष्याच्या चांगल्या-वाईट कामांचं फळ शनीदेव देतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीदेव प्रतिकूल स्थानावर असतात त्यावेळेस मनुष्याला प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागतो.

शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत.

१. राईचं तेल : राईच्या तेलमध्ये लोखंडाचा खिळा टाकावा. त्यानंतर ते तेल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी चढवावं. यामुळे शनीदेव प्रसन्न होतात.

२. कांस्याचं भांडं : कास्यांच्या छोट्या भांड्यामध्ये तेल टाकावं आणि त्यात स्वत:चा चेहरा पाहावा. यामुळे शनीदेव प्रसन्न होतात.

३. पराठा : तेलाचा पराठा बनवून त्याला कोणतीही गोड वस्तू ठेवून गायच्या वासरूला खाऊ घालावं यामुळे तुम्ही शनीदेवाला प्रसन्न करु शकतात.

४. कोणत्याही शनिवारी किंवा शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी सुर्यास्ताच्या वेळी एका पत्रवळीत भोजन घेऊन त्यावर तीळ टाकावी आणि पिंपळाची पूजा करून नैवेद्य दाखवावा. यानंतर ते भोजन काळी गाय किंवा काळा कुत्रा यांना खाऊ घालावा.