‘भाग मिल्खा भाग’ पूर्णपणे बनावट चित्रपट: नसीरुद्दीन शाह

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या मते ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट पूर्णपणे बनावट चित्रपट आहे. फरहाननं नक्कीच चित्रपटात स्वत:वर खूप मेहनत घेतलीय. मसल्स बनवणं, केस वाढवणं... पण तितका अभिनयाबाबत प्रयत्न करीत नाही, असंही नसीर म्हणाले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 22, 2013, 10:46 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या मते ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट पूर्णपणे बनावट चित्रपट आहे. फरहाननं नक्कीच चित्रपटात स्वत:वर खूप मेहनत घेतलीय. मसल्स बनवणं, केस वाढवणं... पण तितका अभिनयाबाबत प्रयत्न करीत नाही, असंही नसीर म्हणाले.
फरहाननं मिल्खा सिंग सारखं दिसण्याचा प्रयत्न केला. नसीर म्हणाले, मिल्खा ते पाहून खूश झाले. कारण १९६०चा त्यांचा फोटो पाहिल्यास फरहानला बघून त्यांना ते आठवलं.
‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट भारतीय अॅथलेटिक मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आहे. ज्यात मिल्खा सिंग यांची भूमिका अभिनेता फरहान अख्तर यांनी केलीय. यंदा ५ जुलैला हा चित्रपट रिलीज झाला होता आणि चित्रपटानं १०० कोटींचा बिझनेसही केला. देशातल्या सर्वच वयोगटातल्या प्रेक्षकांनी चित्रपटाला आपली पसंती दर्शविली.
चित्रपटात फरहान मिल्खा सारखा नाही तर रॉकी दिसतो, असं नसीरुद्दीन शाह यांना वाटतं. मुली फरहानच्या या लूकवर फिदा झाल्या. मात्र तो मिल्खा सिंग सारखा दिसत नव्हता. हा चित्रपट खूप बनावट आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या चित्रपट खूप चांगला आहे, असंही नसीर यांना वाटतं.
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आगामी ‘देढ इश्किया’ चित्रपट लवकरच रिलीज होतोय. यात हुमा कुरेशी आणि माधुरी दीक्षित सोबत ते दिसतील. चित्रपट १० जानेवारीला रिलीज होतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.