कपिल शर्माला महिला आयोगाचा समन्स

कॉमेडीयन कपिल शर्माला महाराष्ट्र महिला आयोगानं समन्स बजावलाय. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्ये कपिल शर्मानं गरोदर महिलेवर विनोद केला होता....

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 29, 2014, 06:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॉमेडीयन कपिल शर्माला महाराष्ट्र महिला आयोगानं समन्स बजावलाय. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्ये कपिल शर्मानं गरोदर महिलेवर विनोद केला होता....
त्यावर महिला आयोगानं कपिल शर्माला नोटीस पाठवून याप्रकरणावर उत्तर मागितलं होतं... मात्र अजूनपर्यंत कपिल शर्मांनं आयोगाच्या नोटिशीला कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र महिला आयोगानं कपिल शर्माला समन्स बजावलेत....

महाराष्ट्रातील एका महिला संघटनेने कपिल विरोधात तक्रार दाखल केली होती. संघटनेनुसार, गर्भवती महिलेबद्दल वक्तव्य करताना कपिल शर्मा याने सर्व सीमा पार केल्याचा आरोप करण्यात आला. कपिलने अशा शब्दांचा वापर केला की अत्यंत आक्षेपार्ह आहे.
हेमा मालिनी पाहुणी म्हणून आलेल्या एपिसोडमध्ये कपिलने हे वक्तव्य केले होते. अशा प्रकारचा विनोद स्वीकार्य नसल्याचे सांगून राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
देशातील खड्ड्याचा फायदाही आहे, एखाद्या गरीब व्यक्तीची बायको गर्भवती असेल तिला हॉस्पिटलमध्ये नेतानाच तिची डिलेवर होईल.... बाळ जन्माला आल्यावर लगेच म्हणेल वाव इट्स इंडिया..... असे वक्तव्य कपिल शर्माने केलं होतं.
यापूर्वी गुत्थीने शो सोडल्यानंतर कपिल वादात अडकला होता. आता या प्रकरणाने पुन्हा अडचणींना त्याने आमंत्रण दिले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.