चित्रपट : भूतनाथ रिटर्न्स
कलाकार : अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुराग कश्यप, उशा जाधव, संजय मिश्रा, उषा नाडकर्णी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा `भूतनाथ रिटर्न्स` हा सिनेमा शुक्रवारी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालाय. नितेश तिवारींनी अगदी चांगल्या वेळेवर हा सिनेमा प्रदर्शित केला. देशात राजकीय बदलाची हवा जोरात आहे. हा सिनेमादेखील राजकीय बदलाचे भाष्य करतो तसेच लोकांना मतदान करण्याचं आवाहनही यासिनेमातून केलेलं आढळतंय.
काय आहे सिनेमाचं कथानक
`भूतनाथ रिटर्न्स` फिल्म `भूतनाथ` सिनेमाचा सिक्वेल आहे. `भूतनाथ` सिनेमा जीथे संपला होता. तिथूनच `भूतनाथ रिटर्न्स`ची सुरुवात होते. मोक्ष मिळवून जेव्हा भूतनाथ त्यांच्या जगात जातो. तिथे त्याची सगळेच खिल्ली उडवतात. कोणालाही न घाबरवता आल्याने भूतनाथ परत लहान मुलांना घाबरवण्यासाठी लोकांच्या जगात येतो. यावेळी पण भूतनाथ मुलांना घाबरवण्यात अपयशी होतो. पण, यावेळी मात्र एका लहान मुलासोबत मिळून वाईट गोष्टींविरुद्ध लढाई भूतनाथ करताना दिसतोय. तसेच भूतनाथनं यावेळी निवडणुकीतही आपलं नशीब आजमावून पाहिलंय.
अभिनय आणि संवाद
`भूतनाथ रिटर्न्स` एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमाचे संवाद चांगले आहेत. अमिताभ बच्चन आणि बोमन ईरानीने उत्तम अभिनय केला आहे. तसंच पार्थ भालेरावने `अखरोट` नावाच्या लहान मुलाची भूमिका केली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारीने `भूतनाथ रिटर्न्स` उत्तम प्रकारे तयार केला आहे.
शेवटी काय तर...
एकूणच `भूतनाथ रिटर्न्स` हा चांगला सिनेमा असून, मनोरंजन करण्यात आणि प्रक्षकांना खिळवून ठेवण्यास सिनेमाला उत्तम यश आलं आहे. निवडणुकीच्या घडामोडींतून थोडा वेळ काढून प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्यास काहीच हरकत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.