www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकंणा सेन शर्मा चक्क रडली. होय खरचं, तसं तर बॉलीवुडमधल्या नट्या ऐरवी कधी रडत नाहीत. त्या सगळ्या फक्त दोन कारणांवरूनच रडतात एक म्हणजे अभिनय करायला सिनेमा मिळाला नाही तर आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या नट्यांसोबत वाजलं तर.
कोंकणा सेन शर्माला रडायला झालं असं की, ती ‘बॉम्बे टॉकीज’ सिनेमा पहायला गेली होती. तो सिनेमा पाहून कोंकणा सेन शर्माला आपल्या आसवांना आवर घालता आला नाही. त्याबाबत ट्विटर वर लिहीताना कोंकणा म्हणते की, ‘हा सिनेमा पहाताना मला हसू पण येत होतं आणि रडू पण येत होतं. चारही कहाण्या खूप भाऊक करतात.’
शुक्रवारी रिलीज होणाऱ्या ‘बॉम्बे टॉकीज’ सिनेमाचं सोमवारी विशेष प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं. भारतीय सिनेमाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा सिनेमा बनवण्यात आला आहे. हा सिनेमा एक लघुसंग्रह असून या सिनेमात चार लहान कथा दाखवण्यात आल्या असून त्या करण जोहर, दिबाकर बॅनर्जी, जोया अख्तर आणि अनुराग कश्यप या चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी बनवल्या आहेत.
या सिनेमाला बॉलिवुड वासियांची शाब्बसकी मिळत आहे. अनेक बॉलिवूडकरांनी आपल्या प्रतिक्रीया ट्विटरवर नोंदवल्या आहेत. यामध्ये जेनेलिया आणि रितेश देशमुखने दिग्दर्शकाच्या कामाची स्तुती केली आहे तर ‘हा सिनेमा पाहून मी भारतीय सिनेमाचा छोटासा भाग असल्याचा गर्व होत आहे’ असं आयुषमान खुरानाने ट्विट केल आहे.