www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘हम गरीब हुए तो क्या हुआ दिलसे आमिर है...’ हा डायलॉग सध्या प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतोय. रवी जाधव दिग्दर्शित टाइमपास या सिनेमानं सगळ्यांनाच भूरळ घातलीये.
रवी जाधवच्या टाइमपासनं पाच दिवसातच दहा कोटींचा टप्पा पार केलाय. जवळपास २६० थिएटर्समध्ये ६८० शोज हाऊसफुल्ल जातायेत. दगडू आणि प्राजक्ताची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावतेय.
दगडू आणि प्राजक्ताची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावतेय. सिनेमातली गाणी, डायलॉग्ज खूपच हिट झालेत.
मराठी सिनेमात हा विक्रम म्हणावा लागेल, टाईमपासच्या डायलॉगशिवाय गाणीही लोकांच्या तोंडपाठ झाली आहेत.
सिनेमा चांगला असला तर प्रेक्षक सिनेमाकडे पाठ फिरवत नाहीत, हे यावरून स्पष्ट झालं आहे. मराठी सिनेमाच्या चाहत्यांमध्ये बीपी, टीपी आणि दुनियादारीच्या निमित्ताने एक उत्साह ओसांडून वाहतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.