www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टाईमपास या सिनेमाने दिवसात साडेसहा कोटी रूपयांची कमाई केली आहे. यामुळे मराठीत टाईमपास सिनेमा कमाईचा नवा विक्रम गाठेल, असं म्हटलं जात आहे.
यापूर्वी रवी जाधव यांच्याच बालक पालकने १० आठवड्यात दहा १० कोटी रूपयांचा आकडा पार केला होता. बालकपालक पेक्षाही टाईमपास अल्पावधीत १० कोटीचा टप्पा पार करणार असल्याचं हाऊसफुल बोर्ड सांगतोय.
आठवड्याला टाईमपासचे जवळपास 5000 शोज थिएटरमध्ये गर्दी खेचतायेत. 250 थिएटर्समध्ये सध्या टीपीचे शोज सुरु आहेत. दगडू-प्राजक्ताची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावतेय.
टाईमपासने पहिल्या दोन दिवसात पाच कोटी रूपयांची कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकींसह हा सिनेमा ५ कोटी रूपयांपर्यंत गेला असला, तरी आठवडासंपेपर्यंत हा सिनेमा १० कोटीच्याही पुढे जाणार आहे.
हम गरीब हुए तो क्या हुआ दिलसे आमीर है. हा डायलॉग सध्या प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतोय. रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास या सिनेमाने अक्षरश: धुमाकूळ घातलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.