फिल्म रिव्ह्यूः रिव्हॉलव्हर राणी

मर्द को दर्द नही होता... हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल पण मर्दला दर्दचा एहसास देण्यासाठी बॉक्स ऑफिसवर रिव्हॉलव्हर राणी आली आहे. साई कबीर दिग्दर्शित कंगना राणावत स्टारर रिव्हॉलव्हर राणी हा चित्रपट रिलीज झाला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 25, 2014, 04:06 PM IST

मर्द को दर्द नही होता... हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल पण मर्दला दर्दचा एहसास देण्यासाठी बॉक्स ऑफिसवर रिव्हॉलव्हर राणी आली आहे. साई कबीर दिग्दर्शित कंगना राणावत स्टारर रिव्हॉलव्हर राणी हा चित्रपट रिलीज झाला. दिग्दर्शकाने बॉलीवुड चित्रपटांच्या धाडणीपासून वेगळा चित्रपट बनवला आहे. चंबळची पार्श्वभूमीवर बनविण्यात आलेल्या रिव्हॉलव्हर राणीची दहशत, पोलीस स्टेशनमध्ये बेछूट गोळीबारासह लव स्टोरीचा तडकाही या चित्रपटात लावण्यात आला आहे.
काय आहे काहणी
चित्रपटात अलका सिंह उर्फ रिव्हॉलव्हर (कंगना राणावत)चीही काहणी आहे. तिची आपल्या परिसरात इतक दहशत आहे की सर्वांची बोलती बंद होऊन जाते. अलकाच्या वडिलांना गावातील दुसरा ठाकूर ठार करतो. त्यानंतर असे काही होते की, अलकाला सहन करणे कठीण होऊन जाते. ती आपल्या पित्याच्या मारेकऱ्याला ठार करते.
त्यानंतर अलका सिंहला तिचा मामा बल्ली (पियूष मिश्रा) आधार देतो. त्यानंतर त्याच्या जीवावर दहशतीचे राजकारण करते. या दरम्यान, अलकाची ओळख रोहन कपूर (वीर दास) याच्याशी होते. रोहन अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहत असतो. पहिल्या भेटीत अलका वीरदासच्या प्रेमात पडते.
बल्ली पुढील निवडणुकीत उदयभान तोमरला (जाकीर हुसैन) कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याची खूण गाठ बांधतो. तोमरने गेल्या निवडणुकीत अलकाला हरवलेले असते. या कामासाठी बल्ली अलकाची मदत घेऊ इच्छितो. या दरम्यान अलका आणि रोहन यांच्या शारीरिक संबंध बनतात. अलका त्याच्या बाळाची आई होणार असते. यानंतरच रिव्हॉलव्हर राणीमध्ये बदल दिसून येतो. ती आपलं प्रेम रोहन आणि मुलासाठी जगणार असते. यात मामाला भीती असते की अलका यामुळे निवडणुकीचं मतदान सोडणार तर नाही ना. पुढे काय होतं.... रिव्हॉलव्हर राणी काय करते यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
अभिनय कसा झाला
कंगना राणावतने क्वीननंतर राणी बनून स्वतःला सिद्ध केले आहे. कंगनाने पुन्हा एकदा दमदार अभिनय केला आहे. कंगनाचा हा अंदाज पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. याचे डायलॉग जबरदस्त आहे. वीर दासने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. पियूष मिश्रा आणि जाकीर हुसै यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
ऑवरऑल
अभिनयासह प्रशंसा करावी लागेल ती दिग्दर्शक साई कबीर यांची. चित्रपटाचा वेग कुठेच कमी झालेला किंवा कमकुवत झालेला दिसला नाही. काही ठिकाणी कंगनाचा अंदाज जास्त प्रखर वाटेल. प्रेक्षकांना चंबळच्या खोऱ्याची लोकेशन पाहायला मिळणार आहे. संगीत ठीक ठाक आहे. मसाला चित्रपट पाहणाऱ्यांना हा चित्रपट आवडणार नाही पण वेगळ्या धाटणीचा चित्रपट तुम्हांला पाहायचा असेल तर हा चित्रपट जरूर पाहा. कंगनाच्या अभिनयाची झलक तुम्हा पाहायची असेल तर हा चित्रपट मिस करू नका.
कलाकार : कंगना रानाउत, वीर दास, पीयूष मिश्रा, जाकिर हुसैन
दिग्दर्शक : साई कबीर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.