`आईसीसी` टी-20 रॅंकींगमध्ये भारत अव्वल

`आईसीसी` टी-20 च्या वार्षिक अंकतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

Updated: May 2, 2014, 11:30 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, दुबई
`आईसीसी` टी-20 च्या वार्षिक रॅंकींगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे. टी-20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेसोबतचा आपला सामना गमावून देखील, भारताने आपल्या पहिल्या स्थानावर उडी मारली आहे. टी-20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला हरवून श्रीलंकेने वर्ल्डकप जिंकला होता.
गेल्या बारा महिन्यात भारताने फक्त एकच टी-20 मधील सामना गमावला आहे. तसेच श्रीलंकाने मात्र गेल्या बारा महिन्यात चार टी-20 सामने गमावले आहेत. या कारणाने श्रीलंकन टीमला मागे टाकत भारताने `आईसीसी` टी-20 मध्ये पहिले स्थान पटकवले आहे.
`आईसीसी`च्या टी-20 रँकिंगमध्ये अजून मोठे फेरबदल झाले आहेत. वेस्टइंडीजची टीम ही टी-20 मध्ये चांगला खेळ करू शकली नाही. याकारणाने त्यांना दोन स्थान खाली जावं लागल आहे. आता वेस्टइंडीजची टीम सातव्या स्थानावर आहे. तर याच यादीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलँड या टीम पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.