www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अरूण जेटली यांनी अर्थ, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे.
महागाई कमी करण्याचं आमच्यासमोर आव्हान आहे, असं अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. सूत्र स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कॅबिनेट विस्तारनंतर संरक्षण मंत्रालय दुसऱ्याकडे सोपवलं जाण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली, तसेच देश एका कठीण काळातून जात असल्याचंही अरूण जेटली यांनी यावेळी सांगितलं.
संरक्षण मंत्रालय कॅबिनेट विस्तारानंतर दुसऱ्याकडे सोपवलं जाणार, यावरून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं दिसून येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.