www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
देशाला नरेंद्र मोदींसारख्या हुकुमशहाचीच गरज आहे, असे मत अभिनेता आणि भाजपचे अहमदाबादमधील उमेदवार परेश रावल यांनी व्यक्त केलंय.
नरेंद्र मोदींसारखा उदारमतवादी हुकुमशहा जो लोकांबद्दल विचार करुन त्यांच्या भल्यासाठी काम करेल, असेच नेतृत्व देशाला हवे आहे असं रावल यांनी म्हटलंय.
अभिनेते परेश रावल यंदा पूर्व अहमदाबादमधून निवडणूक लढवत आहेत, या पार्श्वभूमीवर त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखात दिली आहे.
रावल यांनी या मुलाखातीत मोदी, गुजरात दंगली, मुस्लीम मतदार याविषयी सडेतोड मतं व्यक्त केली आहेत.
बहुमत मिळाल्यावर मोदी जादू दाखवू शकतात का?, असा प्रश्न त्यांना या मुलाखातीत विचारण्यात आला होता. यावर परेश रावल म्हणाले, काही लोक म्हणतात मोदी हुकुमशहा आहेत. पण मी म्हणतो देशाला आज हुकुमशहा नेतृत्वाचीच गरज आहे.
देशासाठी हुकुमशहा आणि उदामतवादी हे योग्य समीकरण ठरेल. उदारमतवादी हुकुमशहा जो देशातील जनतेविषयी विचार करेल, त्यांना समजून घेऊन त्यांच्या विकासाला प्राधान्य देईल.
नरेंद्र मोदीजी देखील प्रत्येकाला विश्वासात घेऊन झटपट काम मार्गी लावतात असं रावल यांनी सांगितलंय.
`मुस्लिम मतदार २००२ मधील गुजरात दंगल विसरले आहेत, मात्र काही राजकीय पक्षच वारंवार दंगलीची आठवण करुन देतात. मुस्लिम समाजाला संघर्ष नकोय. पण त्यांच्या नेत्यांना दोन समुदायांनी भांडावे असे वाटते.
जागरुक मुस्लिम मतदारांना हे लक्षात आले आहे, असा दावा ही यावेळी परेश रावल यांनी केला.
मोदींच्या विवाहावरुन विरोधक त्यांना लक्ष्य करत आहे. यावरही परेश रावल यांनी नाराजी व्यक्त केली.
`राहुल गांधीही अविवाहीत आहेत. पण त्याने देशाला काही फरक पडला का ? मग नरेंद्र मोदींच्या विवाहीत असण्याने काय फरक पडतो ? असा सवालही रावल यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.