अण्णा आंदोलन फक्त सवंग प्रसिद्धीसाठीच का?

अजित सावंत अण्णांचा ब्लॉग वरूनही राजकारण होऊ शकतं याचंच आश्चर्य मला वाटतं, कारण की आजवर टीम अण्णा आणि स्वत: अण्णा या दृष्टचक्रात अडकतच चालले आहेत. आजवर त्यांच्या टीमची नवनवीन बाहेर येणारी प्रकरण आणि तसतसे त्यांचा आंदोलनापासून दूर जाणारे अण्णा. यांमुळे सामान्याचा मनात घर करणारे अण्णा मात्र याच सामान्यांचा रोषाला लवकरच सामोरे जातील असं वाटतं.

Updated: Nov 7, 2011, 06:44 PM IST

अजित सावंत, नेते, काँग्रेस 

 

अण्णांचा ब्लॉग वरूनही राजकारण होऊ शकतं याचंच आश्चर्य मला वाटतं, कारण की आजवर टीम अण्णा आणि स्वत: अण्णा या दृष्टचक्रात अडकतच चालले आहेत. आजवर त्यांच्या टीमची नवनवीन बाहेर येणारी प्रकरण आणि तसतसे त्यांचा आंदोलनापासून दूर जाणारे अण्णा. यांमुळे सामान्याचा मनात घर करणारे अण्णा मात्र याच सामान्यांचा रोषाला लवकरच सामोरे जातील असं वाटतं.

 

टीम अण्णांच्या लोकांची बाहेर येणारी प्रकरण यालासुद्घा काँग्रेसच जबाबदार ठरविले जाते. यांचे नेहमीच वाईट वाटते. 'जशी ज्यांची करणी तशी त्यांची भरणी असते ' त्यामुळे आजवर राजकिय बाबी पासून दूर राहणारे अण्णा मात्र आता राजकारणात ढवळाढवळ करीत असल्याने त्यांच्या आंदोलनाची दशाच झाली आहे असे म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. मला तर असं वाटत की अण्णा आणि टीम अण्णा हे लोक सवंग प्रसिद्घीसाठीच ही उठाठेव करीत आहे.

 

ब्लॉग वरून सुरू असलेले रणकंदन हे अगदीच चित्र स्पष्ट करते, कारण की अण्णांचा आजूबाजूला असणारी लोक ही अत्यंत कारस्थानी अशीच आहेत. ते अण्णांचा पूरेपूर वापर करून घेत आहे. त्यामुशे अण्णांनी यापासून सावध राहावं. टीम अण्णा ही काही धुतल्या तांदळासारखी नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. राजू परूळेकरांचा सुद्घा त्यांनी अगदी अलगदपणे 'गेम' केलाच की, टीम अण्णा ही भष्ठ्राचार मुक्त भारत बनविता भष्ठ्र भारत बनवणाऱ यात काही एक शंका नाही. अण्णांची राजकीय इच्छाशक्ती बळावली, व ते या आंदोलनापासून दूरच दूर फेकले जात आहे असे वाटते

Tags: