पत्नीला खूश करण्याचे 5 उपाय

आज प्रत्येक माणूस आपल्या वैयक्तिक जीवनात एवढा व्यस्त झाला आहे की त्याला कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. पण त्यांच्यासाठी थोडा वेळ तरी दिलाच पाहिजे.

Updated: Aug 26, 2016, 09:39 PM IST
पत्नीला खूश करण्याचे 5 उपाय title=

मुंबई : आज प्रत्येक माणूस आपल्या वैयक्तिक जीवनात एवढा व्यस्त झाला आहे की त्याला कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. पण त्यांच्यासाठी थोडा वेळ तरी दिलाच पाहिजे.

लाईफ पार्टनरला खूश करण्यासाठी ५ उपाय :

१. फूल : लग्नाआधी तर अनेक तरुण आपल्या प्रियसीला फूल तर देतातच. पण लग्नानंतर पत्नीसाठी एखादं फूल आणलं तर तीलाही आनंद होईल. गजरा आणि फूल ही स्त्रीयांची आवडती गोष्ट. त्यामुळे हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही.

२. कूक बना : एखाद्या दिवशी पत्नीला मदत करणं हे ठरवाच. काही नाही पण हातात चाकू घेऊन भाजीपाला तरी कापून देऊ शकता. तुम्हाला जर एखादा पदार्थ बनवता येत असेल तर अजूनच उत्तम. त्यादिवशी पत्नीला तुमच्या हाताने बनवलेली एखादी छान डिश खाऊ घाला.

३. कवी बना : पत्नीला खूश करण्यासाठी तुमच्यातला कवी एक दिवसासाठी जागा करायला काहीच हरकत नाही. यमक शब्द जुळवून तिचं मन तुम्ही जिंकू सकता. शब्दांपेक्षा भावना पोहोचवण्याकडे अधिक भर द्या. 

४. थोडी मदत : पत्नीला एखाद्या कामात मदत करण्यात काहीच हरकत नाही. कारण घर हे दोघांचं आहे आणि दोघांच्या समन्वयानेच ते अधिक चांगलं बनणार आहे. त्यामुळे पत्नीला कोणत्याही कामात एखादी छोटीशी मदत तिला ही आनंद देऊन जाईल आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल.

५. प्रशंसा : पत्नीला एखादे काम नीट झाले नाही तर सगळेच पुरूष बोलून दाखवतात. पण त्यासोबतच ती अनेक चांगली कामे करत असते त्याचं कौतुक आपण कधीच करत नाही. त्यामुळे कोणत्याही चांगल्या कामचं कौतुक करा कारण कॉम्प्लीमेंट्स हे प्राईसलेस असतात असं म्हणतात.