मुंबई : तुम्ही जर हेल्मेट वापरत असाल तर तुम्हाला केसांची चिंताही जाणवत असेल... पण, यावरही तुम्ही उपाय करू शकतात.
योग्य पोषणयुक्त आहार न घेणं, एखाद्या आजारानं ग्रस्त असणं किंवा केसांची योग्य काळजी न घेणं हेदेखील तुमच्या केसांची पडझड होण्यामागची महत्त्वाची कारणं असू शकतात... त्यासाठीच या काही उपाययोजना करा आणि केस गळण्यापासून थांबवा...
लिंबूचा रस काढून किंवा वापरलेलं लिंबू डोक्यावर हलक्या हातांनी केसांच्या मुळाशी लावून घ्या... केसांमध्ये खाज आणि कोंड्याची समस्या असेल तरीही ती दूर होण्यास मदत होईल.
अगोदर तुमच्या केसांना पाण्यानं ओलं करून घ्या आणि हलक्या हातांनी केसांना मसाज करून घ्या. त्यानंतर सफरचंदाचं व्हिनेगर केसांवर लावून थोडा वेळ ठेवा... त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. त्यामुळे तुमच्या केसांना मजबुती मिळेल.
कांद्याचा रस केसांना लावल्यानं केसांना चमक येते... आणि त्यांना कंडिशनिंगही मिळतं. १५ मिनिटांपर्यंत हा रस केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवून घ्या.
बदामाचं तेल तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी लाभदायक ठरतं. यामध्ये असलेलं विटॅमिन ई केसांना मजबूत आणि चमकदार बनवतं.
केवळ चेहऱ्यासाठीच नाही तर केसांसाठीही कोरफड उपयोगी ठरते. कोरफडीचा गर काढून त्यानं हलक्या हातांनी केसांना मसाज द्या... किंवा तुम्ही केस धुण्यासाठी कोरफडयुक्त शॅम्पूचाही वापर करू शकता.
लसूण केसांसाठीही उपयोगी आहे. लसून वाटून त्याचा रस काढून घ्या... आणि तो केसांच्या मुळापर्यंत लावा. यामुळे, तुमच्या केसांना चमक आणि मजबुती मिळेल... आणि हेल्मेट वापरलं तरी यामुळे तुमचे केस लवकर तुटणार नाहीत.
केसांमध्ये अंड्याचा बलक लावल्यानं केसांचं नॅचरल कंडिशनिंग होतं. तसंच केस मजबूतही होतात. जवळपास २० मिनिटांपर्यंत तुम्ही केसांना अंड्याचा बलक लावून ठेवू शकता.
३ आवळा आणि १ संत्री वाटून त्याची पेस्ट बनवून घ्या... ही पेस्ट केसांवर १५-२० मिनिटांपर्यंत लावून ठेवा.... आणि मग बघा कमाल... तुमचे केस गळण्याची समस्या १५ दिवसांत दूर होईल.