मुंबई : क्रोध ही एक मानवी भावना आहे. मनाविरूद्ध घडणाऱ्या गोष्टींचा माणसाला राग येणे साहजिक आहे. पण जेव्हा हा क्रोध अनावर होतो तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. साहजिकच या समस्या भावनिक असतात. यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो.
रागीट व्यक्तींचे समाजात जगणे कठीण होऊन जाते. इतरांच्या बोलण्याचे चुकीचे अर्थ घेतले जातात. त्यांच्या जवळच्या माणसांच्या जगण्यावरही याचा वाईट परिणाम होतो. शिवाय रागामुळे हृदय आणि रक्तदाबाच्या समस्याही निर्माण होतात. यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे.