मुंबई : तुम्ही केळी खाऊन त्याची साल इकडे-तिकडे फेकत असाल तर इकडे लक्ष द्या! तुम्ही ही सवय बदला... कारण, हीच केळीची साल तुमच्या आरोग्यासाठीही पोषक ठरते.
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, केळांच्या सालामध्ये ‘सेरॉटॉनिन हार्मोन्स’ नॉर्मल ठेवण्याचे गुण असतात. व्यक्ती आनंदी राहण्यासाठी या हार्मोन्सची मदत होते.
केळीच्या सालात भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आणि कार्बोहाइड्रेट असतात. यात बी-6, बी-12, मॅगनीशिअम, एन्टीऑक्सिडेंट, पोटॅशिअम आणि मँगनिझ ही जीवनसत्त्वं आढळतात. हे मेटाबॉलिज्मसाठी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत.
शास्त्रज्ञांच्या मते, डोकं दुखत असेल तर केळ्यांची साल बारीक करून त्याची पेस्ट दुखत असलेल्या भागात 15 मिनिटपर्यंत लावल्यानं आराम मिळतो. रक्तातील पेशीमध्ये तयार होणाऱ्या तणावामुळे डोकेदुखी होते. केळाच्या सालीत असलेल्या मॅग्नेशिअम पेशींमध्ये जाऊन डोकेदुखी थांबविण्यासाठी मदत करतं.
केळ्याची साल दररोज दातावर घासल्यामुळे ते चमकतात. कारण त्यामध्ये असलेले पॉटेशिअम, मॅग्नेशिअम आणि मँगनिज दातांवर जमलेला पिवळसरपणा नाहिसा करण्यासाठी मदत करतो... हा उपाय नियमित वापरल्यास तुमच्या दातांवर नैसर्गिक चमक कायम राहते.
पाय आणि हातांवर येणाऱ्या चामखिळींवर साल चोळल्याने किंवा रात्रभर केळीची साल त्या भागात ठेवल्यामुळे त्या भागावर पुन्हा चामखीळ येत नाही.
चेहऱ्यांवर उठणाऱ्या पुरळांवर केळ्याच्या सालींची पेस्ट करून पाच मिनिटपर्यंत ठेवल्याने पुरळ कमी होऊन चेहराही तजेलदार दिसतो.
या व्यतिरिक्त केळ्याची साल ही त्वचेत असलेली पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठीही उपयोगी ठरतात.
अंड्यातील पिवळा बलक आणि केळीचे साल वाटून हे एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने सुरकूत्या येत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.