ऑक्सिजनची कमतरता ठरते पिंपल्ससाठी कारणीभूत

कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. तसेच वाढलेल्या प्रदूषणाचा परिणामही चेहऱ्यावर होतो.

Updated: Nov 3, 2016, 03:28 PM IST
ऑक्सिजनची कमतरता ठरते पिंपल्ससाठी कारणीभूत title=

मुंबई : कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. तसेच वाढलेल्या प्रदूषणाचा परिणामही चेहऱ्यावर होतो.

हार्मोन्सचे असंतुलन, मलावरोध, अनियमित मासिक पाळी, जास्त मीठ, आंबट आणि मसालेदार जेवण ही पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे आहेत. पिंपल्सला सतत स्पर्श केल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची लस पसरते.

मात्र तुम्हाला माहीत आहे का ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही पिपंल्सची समस्या निर्माण होऊ शकते.

सॅन डिएगोच्या कॅलिफोर्निया युनिर्व्हसिटीत करण्यात आलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आलीये. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.